भगवती, दवर्ली (मडगाव) येथे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात ईद-ए-मिलादच्या निमित्ताने झेंडा लावल्याने तणाव !

मंदिर परिसरातील ईदचा झेंडा काढण्यासाठी गेलेले श्री स्वाथी समर्थ मंदिराचे प्रमुख जयेश नाईक आणि त्यांचा मुलगा ओम नाईक यांच्यावर धर्मांधांकडून लोखंडी सळीने आक्रमण : पोलिसात परस्परविरोधी तक्रार प्रविष्ट

  • मंदिर परिसरात ईदचा झेंडा लावणे, हा धर्मांधांचा उद्दामपणाच ! तो काढायला सांगितल्यावर आक्रमण करणारे धर्मांध किती हिंसक आहेत, ते यातून दिसून येते.
  • देशाला धर्मनिरपेक्ष ठरवून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केल्याचा हा परिणाम आहे. जे बांगलादेशात झाले, ते आता भारतातही होण्यापूर्वी हिंदूंनी संघटित आणि सावध होणे आवश्यक आहे.

मडगाव, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – भगवती, दवर्ली येथे श्री स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरात ईद-ए-मिलादच्या निमित्ताने धर्मांधांनी झेंडा लावला होता. श्री स्वामी समर्थ मंदिराचे प्रमुख श्री. जयेश नाईक यांनी ‘हा झेंडा काढावा’, अशी विनंती स्थानिक मुसलमानांना केली; मात्र ही मागणी फेटाळण्यात आली. हा झेंडा काढण्यासाठी मंदिराचे प्रमुख श्री. जयेश नाईक स्वत: पुढे सरसावले असता तणाव निर्माण झाला. श्री. जयेश नाईक आणि धर्मांध यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि प्रकरण हातघाईवर आले. त्या वेळी श्री. जयेश नाईक यांच्या डोक्यावर धर्मांधाने पाठीमागून लोखंडी सळी मारली. त्यामध्ये ते जखमी झाले. वडिलांना मारहाण केल्याने जयेश नाईक यांचा मुलगा ओम नाईक त्यांच्या सहाय्यासाठी पुढे आला असता, त्याच्या तोंडावर ठोसा हाणून त्यालाही घायाळ करण्यात आले. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यावर मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपिल नायक हे पोलीस बंदोबस्तासह समर्थ गडावर आले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी मंदिराचे प्रमुख श्री. जयेश नाईक आणि त्यांचा मुलगा ओम नाईक मंदिर परिसरात वाढलेली झुडपे काढून साफसफाई करत होते. या वेळी त्यांना ईद-ए-मिलादच्या निमित्ताने लावण्यात आलेला झेंडा आढळून आला. हा झेंडा काढावा अशी विनंती त्यांनी तेथील मुसलमानांना केली; मात्र ही विनंती फेटाळून लावण्यात आली. हा झेंडा काढण्यासाठी श्री. जयेश नाईक स्वत: गेले असता मारहाणीचा प्रसंग घडला.

स्थानिकांना भडकावण्यासाठी मंदिर परिसरात झेंडा उभारला ! – जयेश नाईक, प्रमुख, श्री स्वामी समर्थ मंदिर

घटनेविषयी माहिती देतांना श्री स्वामी समर्थ मंदिराचे प्रमुख श्री. जयेश नाईक म्हणाले, ‘‘श्री स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरात स्थानिकांना भडकावण्यासाठी धर्मांधांनी झेंडा लावला. ईद-ए-मिलाद कार्यक्रम गत आठवड्यात साजरा करण्यात आला होता. प्रारंभी ‘मी स्थानिकांना कोयता घेऊन मारहाण करण्यासाठी आलो आहे’, अशी अफवा पसरवून धर्मांधांनी जमाव जमवला. झेंडा काढण्यासाठी मला जायचे होते, तर मी मोठा जमाव घेऊन तशी कृती केली असती. ईद-ए-मिलाद कार्यक्रम झाल्यानंतरही हा झेंडा का काढण्यात आला नाही ? चर्चा करतांना धर्मांधांनी लोखंडाची सळी माझ्या डोक्यावर हाणली, तर माझ्या मुलावर धर्मांधांच्या गटाने आक्रमण केले.

पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुसलमानांना २५ ऑक्टोबरपर्यंत झेंडा उभारण्याची अनुमती देण्यात आली होती. (२५ ऑक्टोबरपर्यंत मंदिर परिसरात झेंडा लावायची अनुमती देण्यात आली होती का ? तसे असेल, तर पोलीस किंवा प्रशासन ज्यांनी ही अनुमती दिली होती, त्याची मोठी चूक आहे. मंदिर परिसरात ईदचा झेंडा लावणे हिंदूंनी खपवून घ्यावे असे वाटते का ? मशिदीत भगवा ध्वज कधी लावला जाईल का ? – संपादक) स्थानिक मुसलमानांच्या मते श्री. जयेश नाईक यांनी धार्मिक कलह निर्माण करण्यासाठी ही कृती केल्याचा आरोप केला.

दवर्ली येथील सलमान आणि अन्य दोघांच्या विरोधात जयेश नाईक यांची तक्रार

जयेश नाईक यांनी सकाळी ११.३० वाजता दवर्ली येथील सलमान आणि अन्य दोघे यांच्या विरोधात मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार प्रविष्ट केली. दवर्ली येथील सलमान आणि अन्य दोघे यांनी जाणूनबुजून श्री स्वामी समर्थ मंदिराच्या आवारात प्रवेश करून मला आणि माझा मुलगा ओम नाईक याला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विरोधी गटाच्या वतीने पोलिसात तक्रार

परवीन खान यांनी श्री. जयेश नाईक आणि त्याचा मुलगा ओम नाईक यांच्या विरोधात मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘ईद’ सणाच्या निमित्ताने लावलेल्या धार्मिक झेंंड्याची दोरी कापून हा झेंडा भूमीवर पाडून धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुनिया खान या महिलेला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. श्री. जयेश नाईक यांनी मुनिया खान हिच्या घराच्या छपराची मोडतोड करून तिला कोयत्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक करिष्मा प्रभु या प्रकरणी अन्वेषण करत आहेत.

दोन्ही तक्रारींवरून पोलिसांनी प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला आहे आणि  परिस्थितीवर पोलीस नियंत्रण ठेवून आहेत. स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमकही मागवण्यात आली आहे. मडगाव परिसरातील रूमडामळ आणि घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे बर्‍याच वेळा धार्मिक तणाव निर्माण होत असतो. (जेथे धर्मांध आहेत, तेथे धार्मिक तणाव निर्माण झाला नाही, तरच नवल ! – संपादक)