जलवाहिन्या फुटल्याने म्हापसा (गोवा) बाजार जलमय

नागरिकांनी माहिती दिल्यानंतर जलवाहिन्या सायंकाळपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या. ‘अशा परिस्थितीत अचानक पाऊस पडल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे गटारांची स्वच्छता करण्यात यावी.

गोवा : हरवळेतील पारंपरिक दिवजोत्सव आणि रथोत्सव रहित !

हिंदूंसाठी असे होणे दुर्दैवी ! हिंदूंनी सामंजस्याने समस्या सोडवणे आवश्यक !

गोवा : मानपानावरून हरवळे येथील श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थानात उफाळला वाद

या मंदिरात हरवळे आणि कुडणे येथील गावकर महाजनांचाही मानपान असतो. या मानपानाच्या सूत्रावरून गेल्या काही वर्षांपासून देवस्थानात वाद चालू आहे; मात्र वेळोवेळी प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर सामोपचाराने वाद मिटवला जातो.

Goa Reservation For Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणासंबंधी अधिसूचना काढा ! – ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर एस्.टी.’ची मागणी

गोव्यातील अनुसूचित जमातींना विधानसभेत आरक्षण मिळावे, यासाठी गोवा सरकार सातत्याने पाठपुरावा करत असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. गोव्यात आजवर अनुसूचित जमातींच्या लोकांची संख्या अल्प असल्याच्या कारणाखाली त्यांना राजकीय आरक्षण दिले जात नव्हते.

महिला सशक्तीकरणासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू होणे आवश्यक ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘अनेक राजकीय पक्ष समान नागरी कायद्यावर राजकारण करत आहेत. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’ – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : वास्को येथील सरकारी व्यायामशाळेचे ‘फॉल्स सिलिंग’ कोसळले !

सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर या व्यायामशाळेत येणार्‍यांमध्ये भीती पसरली आहे.

गोवा : प्रथम वैध कागदपत्रे सादर करा आणि नंतर टाळे ठोकण्याच्या विरोधात आदेश मागण्यासाठी या ! 

अनधिकृत बांधकाम करणार्‍या काही ‘शॅक’चालकांनी या आदेशातून सवलत देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यास अनुसरून गोवा खंडपीठाने सवलत मागणार्‍या याचिकादारांना सुनावले आहे.

Goa Illegal Constructions : हणजूण (गोवा) येथील अनधिकृत बांधकामांवर धिम्या गतीने कारवाई !

या प्रकरणी उच्च न्यायालयाने हणजूण पंचायतीच्या सचिवांना कारवाईसंबंधी माहितीचे प्रतिज्ञापत्र ६ मार्च या दिवशी न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.

Indian Navy : संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते गोव्यातील नौदल युद्ध महाविद्यालयाच्या ‘चोल’ इमारतीचे उद्घाटन

प्राचीन सागरी साम्राज्य चोल राजवंशाच्या नावावरून नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नव्या इमारतीला नाव दिले आहे. ही इमारत भारतीय नौदलाच्या आकांक्षा आणि सागरी उत्कृष्टता यांचा वारसा दर्शवते.

Goa Drugs Racket : गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून भाग्यनगर येथे अमली पदार्थ पुरवल्याचे उघड !

हे कोलवाळ कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! कोलवाळ कारागृह हा अमली पदार्थांचा अड्डा बनला आहे कि कारखाना ? शासनाने याची त्वरित नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !