पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेश भक्ताकडून १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण !

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेशभक्ताने विविध प्रकारचे पाचू असलेला, तसेच रेखीव नक्षीकाम केलेला १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीला हा मुकुट घालण्यात आला.

नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्तीचे विसर्जन करू देणार नाही ! – महापौर किशोरी पेडणेकर

नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्तीचे विसर्जन केल्याने श्री गणेशाच्या मूर्तीत पूजनामुळे निर्माण झालेली पवित्रके सर्वदूर पसरतात आणि पर्यावरणासह अखिल मानवजातीला त्याचा लाभ होतो, असे शास्त्र आहे !

गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक

‘जिल्ह्यात सण उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, असा आदेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणेदारांना दिले आहेत.

उत्तरप्रदेश येथून हिंगोली येथे आलेल्या अष्टधातूच्या मूर्तीची स्थापना !

‘शहरात गणेशमूर्ती आल्यानंतर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मूर्तीचे विधिवत् पूजन केले आहे. ४ फूट उंचीची असलेली अष्टधातूची मूर्ती ८५ किलो वजनाची आहे. ‘कोविड’च्या सर्व नियमांचे पालन करून शहरात मूर्ती स्थापना केली आहे.

अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारी श्री गणेशमूर्तीची विटंबना रोखा !

केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘मूर्तीदान’ ही अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारे जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्तीची विटंबना तातडीने रोखण्यात यावी, या मागणीचे निवेदन विविध ठिकाणी देण्यात आले.

प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समिती

प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली.

वैज्ञानिक स्तरावर लक्षात आलेले ‘श्री गणपति अथर्वशीर्ष पठणा’चे महत्त्व !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. फोंडा, गोवा येथील श्री. प्रणव साधले यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत १६.९.२०१८ या दिवशी श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राची १ सहस्र … Read more

कोरोनाच्या संकटकाळातही राज्यभरात गणेशभक्तांकडून श्री गणरायाचे उत्साहात स्वागत !

मंगलमूर्ती असणार्‍या श्री गणरायाने त्याचे मंगल आशीर्वाद मिळवून देण्यासाठी ११ दिवस त्याची सेवा करण्याची संधीच भक्तांना उपलब्ध करून दिली आहे.

श्री गणेशाप्रती भाव वाढवूया !

गणेशोत्सवाच्या कालावधीत करण्यात येणार्‍या विविध धार्मिक कृतींमागील शास्त्र समजून घेऊन त्याला भावाची जोड दिल्यास श्री गणेशाची कृपा निश्चितपणे संपादन होईल आणि खर्‍या अर्थाने गणेशचतुर्थीचा उद्देश साध्य होईल.

पंतप्रधान मोदी यांनी मराठीमधून दिल्या श्री गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा !

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘आपणा सर्वांना गणेशचतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया !’