मुंबई – विघ्नहर्ता आणि सर्वांना प्रिय असणार्या श्री गणपति बाप्पाचे राज्यभरात १० सप्टेंबर या दिवशी घरोघरी उत्साहात अन् आनंदात स्वागत करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळून गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोषात त्यांच्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे ‘गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?’ ‘करायचा कि नाही ?’ ‘ऐनवेळी वेगळे निर्बंध लागू केले, तर काय करायचे ?’ असे विविध प्रश्न समोर असतांना हे विघ्न दूर करून गणराया घरोघरी स्थानापन्न झाले. मंगलमूर्ती असणार्या श्री गणरायाने त्याचे मंगल आशीर्वाद मिळवून देण्यासाठी ११ दिवस त्याची सेवा करण्याची संधीच भक्तांना उपलब्ध करून दिली आहे.