देवसरी (जिल्हा यवतमाळ) गावातील ९९ पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसन प्रस्तावाला मान्यता देणार ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

आमदार संतोष बांगर यांनी देवसरी गावातील पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याला मंत्र्यांनी असे उत्तर दिले.

चिपळूण येथील महापुराला प्रशासनच उत्तरदायी ! – उद्योजक आशिष जोगळेकर

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात महापुराविषयीचा उल्लेख प्रकर्षाने करण्यात येऊन त्यावर उपाययोजनाही सुचवूनसुद्धा प्रशासनाने त्या राबवल्या नाहीत. त्याच्यामुळेच दोन दिवसांत झालेल्या अतीवृष्टीत चिपळूण शहर आणि परिसर उद्ध्वस्त झाला.

हवामान पालटामुळे भारताच्या किनारपट्टी भागांत पुराचा धोका वाढला ! – शास्त्रज्ञांचा अभ्यास

हवामानातील पालटामुळे भारताचा किनारपट्टी भाग, बंगालचा उपसागर, दक्षिण चीन समुद्र आणि दक्षिण हिंद महासागर येथे काही असामान्य पालट दिसू शकतात, असे शास्त्रज्ञांंच्या अभ्यासातून समोर आले आहे.

कोकणात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नद्यांतील गाळ काढला जाणार

कोकणातील नदीकाठच्या शहरांत सातत्याने निर्माण होणार्‍या पूरस्थितीविषयी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांनी नद्यांतील गाळ काढण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी सूचना संबंधित यंत्रणांना दिली आहे.

पृथ्वीवरील समुद्रात विशालकाय उल्कापिंड कोसळणार !

फ्रान्समधील जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने ५ शतकांपूर्वी सहस्रो भविष्ये लिहून ठेवली असून त्यांतील अनेक भविष्ये खरी ठरली आहेत. त्याच्या पुस्तकात एकूण ६ सहस्र ३३८ भविष्ये वर्तवलेली आहेत.

आंध्रप्रदेशात पुरामुळे १७ जणांचा मृत्यू, तर १०० जण बेपत्ता

वायूदल, ‘एस्.डी.आर्.एफ्.’ आणि अग्नीशमन दल यांच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आले आहे.

तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे १४ जणांचा मृत्यू

पावसामुळे विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवस तमिळनाडूच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका ! – मेधा पाटकर

विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका बसला.

मुसळधार पावसामुळे नैनिताल (उत्तराखंड) येथे नाशिकमधील २७ यात्रेकरू अडकले !

उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत. याचा फटका नैनितालमध्ये अडकलेल्या येथील २७ यात्रेकरूंना बसला आहे.

सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन !

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ मित्र मंडळ चौक येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.