अमरनाथ गुंफेजवळ आलेल्या पुरामुळे १६ जणांचा मृत्यू, तर ४० जण बेपत्ता

बचावकार्य चालू

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अमरनाथ गुंफेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळाजवळ ८ जुलैला झालेल्या प्रचंड पाऊस झाला. यामुळे पूर येऊन आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण बेपत्ता आहेत.

या पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालय आदींची हानी झाली. येथे बचावकार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती  निवारण दल, पोलीस आणि नागरी प्रशासन यांचे अधिकारी अन् कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. यासह इंडो-तिबेटियन सीमा पोलीसह यात सहभागी झाले आहेत. सीमा सुरक्षा दलाचे हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येत आहे. सध्या बालताल आणि पहलगाम येथे यात्रेकरूंना रोखण्यात आले आहे.