दावलेश्वर महादेव मंदिर पाण्यात

नाशिक – मागील काही दिवसांपासून मुसळधार बरसणार्या पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गंगापूर, कश्यपी धरणातील पाणीसाठा वाढला आहे, तर त्र्यंबकेश्वर, हरसूल, सुरगाणा आदी भागांत रस्ते खचले असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्र्यंबक तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्र सीमेवर दमण गंगेच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र दावलेश्वर देवस्थान दमणगंगेच्या पुरामध्ये बुडाले आहे. या ठिकाणी असलेल्या ४५ फूट उंचीच्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे.
परिसरात चालू असलेल्या पावसामुळे दमणगंगेला पूर आला आहे. मंदिराच्या काठावर आजूबाजूला भात शेती मोठ्या प्रमाणावर असून पुरामुळे शेतात पाणी घुसले आहे. अनेक ठिकाणी भात लावणी झाली असल्याने रोपांची हानी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)