अतीवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात लाखो हेक्टर शेतातील पिकांची हानी !

कृषी विभागाच्या अहवालानुसार पावणेचार लाख हेक्टर शेतीची हानी असली, तरी ‘यापेक्षाही अधिक हानी झाली आहे’, असे कृषी तज्ञांचे मत आहे. पिकांची सर्वाधिक हानी बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे.

‘गुलाब’ वादळामुळे झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतीपिकांची हानी !

मराठवाड्यात प्रथमच १४९.१ टक्के पाऊस झाला असून २० लाख हेक्टरवरील उभ्या पिकांची हानी झाली आहे. काही ठिकाणी पिके सडली आहेत. शेतकर्‍यांची मोठी हानी झाल्याने सरकारने तात्काळ साहाय्य करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेतकर्‍यांना हानीभरपाई न दिल्यास विमा अधिकार्‍यांना कारागृहात टाकू ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

तीवृष्टीमुळे मराठवाड्यात तब्बल २० लाख हेक्टर शेतीची हानी झाली आहे. त्यापैकी ९० टक्के पंचनामेही पूर्ण झाले आहेत. विमा आस्थापनांविषयी शेतकर्‍यांकडून अनेक तक्रारी येत आहेत. या वेळी अतीवृष्टी झालेल्या भागांत हानीभरपाई न दिल्यास विमा आस्थापनांच्या अधिकार्‍यांना कारागृहात पाठवू….

औषधी वनस्पतींच्या लागवडीचे आमीष दाखवत ५०० हून अधिक शेतकर्‍यांची २३ कोटी रुपयांची फसवणूक !

शेतात औषधी वनस्पतींची रोपे, लागवड, खत पुरवठा, देखरेख या सुविधांसह १ वर्षाने पीक जागेवर विकत घेण्याचे आमीष शेतकर्‍यांना दाखवण्यात आले होते. पाटणकर यांनी शेतकर्‍यांना एकरी ५० सहस्र रुपये आस्थापनामध्ये गुंतवण्यास भाग पाडले होते.

अन्नदात्या शेतकर्‍यांचा आक्रोश !

सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी अन् महापूर यांमुळे अन्नदाता शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे कि मानवनिर्मित याचेही संशोधन झाले पाहिजे. मानवी चुका, ढिसाळ नियोजन यांमुळे राष्ट्रीय संपत्तीचीही प्रचंड हानी होते…..

मेघोली (कोल्हापूर जिल्हा) तलावाचा अपघात हा नैसर्गिक ! – स्मिता माने, कार्यकारी अभियंता

मेघोली तलाव हा ‘क्वाटर्झाईट’ खडकाच्या भुपृष्ठ रचनेतील अंतर्गत हालचालीमुळे फुटला. मेघोली तलावाचा अपघात हा नैसर्गिक आहे. याच खडक थराच्या भुपृष्ठरचनेतील वेदगंगा नदी खोर्‍यातील इतर तलावही आहेत. त्यामुळे आता याच प्रकारातील जलसंपदा विभागाच्या अन्य प्रकल्पांची भूगर्भीय पहाणी करण्यात येणार आहे..

अमरावती येथे बनावट बियाणांमुळे २०० हेक्टरवरील मिर्ची खराब !

शेकडो शेतकरी आर्थिक हानीमुळे आत्महत्या करत असतांना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संकटग्रस्त असतांना शेतकर्‍यांना बनावट बियाणे देऊन त्यांना फसवणारी आस्थापने त्यांच्या जिवाशीच खेळत आहेत !

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस !

पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कठडे वाहून गेले आहेत. विजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

शेतकर्‍यांच्या व्यथा !

शेतकर्‍यांनी हवालदिल न होता शेती उत्तम रितीने करण्यासाठी वैध मार्गाने लढत त्यावर उपाय काढावा आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रयत्न केल्यास शेतीच्या समस्या योग्य प्रकारे सुटतील, हे लक्षात घ्यावे !

शिरापूर (सोलापूर) येथील शेतकर्‍याने मागितली गांजा लागवडीची अनुमती !

भारतासारख्या कृषीप्रधान देशात हमीभाव न मिळाल्याने गांजाची शेती करण्याची अनुमती मागण्याची वेळ येते यापेक्षा दुर्दैव ते काय ?