कामगारांचा अभाव !

भारतासारख्या शेतीप्रधान देशात उत्तम शेती न होण्यातील कामगारांचा अभाव ही एक गंभीर समस्या झाली आहे. सरकारने याकडेही लक्ष द्यावे, ही अपेक्षा !

शेतकर्‍यांच्या अनुमतीविना उसाच्या देयकातून थकबाकी वसूल करणार नाही ! – महावितरण

खरोखरच जे शेतकरी गरीब आहेत, त्यांना ही सूट मिळणे योग्य आहे; परंतु जे शेतकरी सधन आहेत, त्यांनी वीजदेयके भरणे आवश्यक आहे. गरीब आणि सधन शेतकरी यांच्यासाठी वेगळे नियम असणारी यंत्रणा हवी !

अणाव, हुमरमळा येथे घरावर वीज पडून ८० सहस्र रुपयांची हानी

सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, पोलीस पाटीलआदींनी दळवी यांची भेट घेऊन दळवी कुटुंबियांना धीर दिला.

टाळंबा धरण प्रकल्प रहित करण्याची शेतकर्‍यांची मागणी

शेतकर्‍यांची समस्या जाणून न घेता मंत्री धरणाचे काम चालू करण्याची घोषणा कशी काय करतात ?

साहाय्य न केल्यास शेतकरी मंत्र्यांना बडवल्याविना रहाणार नाहीत !

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्च्यात भाजपचे नेते अनिल बोंडे यांची चेतावणी !

शेतकर्‍यांच्या समस्येवर उपाय काय ?

महावितरण आस्थापनाने थकीत वीजदेयकांची रक्कम न भरल्याने शेतकर्‍यांच्या वीजकपातीची कारवाई चालू केली आहे. महावितरणने ती कारवाई करू नये; म्हणून मोडनिंब (जिल्हा सोलापूर) येथे शेतकर्‍यांनी नुकताच मोर्चा काढला.

मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी ३ सहस्र ७०० कोटींपैकी २ सहस्र ८३० कोटी रुपये मिळाले !

अतीवृष्टीमुळे मराठवाड्यात ४७ लाख ७४ सहस्र ४८९ शेतकर्‍यांची ३६ लाख ५२ सहस्र ८७२ हेक्टर शेतीची हानी झाली होती.

शेतकरी अडचणीत का ?

वर्षांतील १० मास शेतकर्‍याला दिवस-रात्र घाम गाळूनही अपेक्षित असा आर्थिक लाभ होत नाही आणि त्यातून तो आत्महत्येकडे वळतो, हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. शेतकरी मागास का रहात आहे ?

आंबेगाव तालुक्यातील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यास जलसमाधी घेण्याची ग्रामस्थांची चेतावणी !

ग्रामस्थांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली तरीही जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठीची संवेदनशीलता शासनामध्ये निर्माण होत नाही, हे संतापजनक आहे.