झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाच्या ठिकाणांवरील धाडीमध्ये २ ‘एके-४७’ रायफली सापडल्या !

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने धाडी घातल्या आहेत. त्यांच्या कपाटांमध्ये २ ‘एके ४७’ रायफली मिळाल्या आहेत.

बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्या घरांवर सीबीआयच्या धाडी

राष्टीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) या पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर धाडी घातल्या.

सहभागाची निश्चिती झाल्याविना संचालकांवर कारवाई करता येणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या अधिकोषाचे अध्यक्ष सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असून त्यांची चौकशी चालू आहे.

आम आदमी पक्ष फोडून भाजपमध्ये आल्यास सर्व खटले मागे घेऊ !

भाजपकडून प्रस्ताव आल्याचा देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा दावा

संभाजीनगर येथे ‘ईडी’विरुद्ध उद्धव ठाकरे गटाने लावलेले फलक काढले !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे जय विश्वभारती कॉलनी शाखाप्रमुख रोहन आचलिया यांनी रोपळेकर, विवेकानंद चौक येथे ‘ईडी’ कारवाईविषयी फलक लावले.

शहरी नक्षलवाद्यांच्या निधीचे अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण होणार !

कोरेगाव भीमा दंगल आणि एल्गार परिषदेतील प्रक्षोभक वक्तव्य यांप्रकरणी अटकेत असलेले अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांच्या आर्थिक व्यवहारांचे अन्वेषण करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने मागितलेली अनुमती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने दिली.

महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कायद्याचा धाक !

कायद्याचा अपवापर करून कुरघोडी करणार्‍या राजकारण्यांपेक्षा तत्त्वनिष्ठतेने चालणारे शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्र हवे !

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स !

पत्राचाळ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) शिवसेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे समन्स पाठवले आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे.

खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ !

अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात राऊत यांच्या कोठडीत १० ऑगस्टपर्यंत वाढ करण्याची मागणी केली होती.यापूर्वीची त्यांना दिलेली ३ दिवसांची कोठडी संपल्यावर ४ ऑगस्ट या दिवशी त्यांना ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

पत्राचाळ आर्थिक अपहाराप्रकरणी ईडीकडून मुंबईत २ ठिकाणी धाडी !

पत्राचाळ आर्थिक अपहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने २ ऑगस्ट या दिवशी दादर आणि कांजूरमार्ग येथे धाडी टाकल्या. या प्रकरणी आणखी काही जणांची चौकशी चालू आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत अटकेत आहेत.