संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ !

मुंबई – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ भूमी अपहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) ३१ जुलै या दिवशी संजय राऊत यांना अटक केली होती.

पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा आरोप ईडीने केली आहे.