देहलीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या स्वीय्य साहाय्यकाला अटक !

निवडणुकांच्या भीतीने भाजपने कारवाई केल्याचा आरोप !

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने माझ्या स्वीय्य साहाय्यकाच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली आहे, असा आरोप देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. सिसोदिया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. या वेळी त्यांनी भाजपवर आरोप केला की, भाजप गुजरात निवडणुकांवरून घाबरला असून त्याने माझ्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवला, तसेच अन्वेषण यंत्रणांकरवी माझ्या बँकेचे लॉकर्स, तसेच माझ्या गावी जाऊन तेथेही अन्वेषण केले . तथापि त्यांच्या हाती काहीही लागले नाही. आता त्यांनी माझ्या स्वीय्य साहाय्यकाला अटक केली आहे. भाजपच्या लोकांना निवडणुकांची एवढी भीती का वाटते ?