अवैध खाणकाम प्रकरण
रांची (झारखंड) – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणातील चौकशीस झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावला. सोरेन यांना ३ नोव्हेंबर या दिवशी चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.
झारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन की मुसीबतें बढ़ सकती हैं. प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने खनन मामले में हेमंत सोरेन को समन भेजा है. #HemantSoren (@MunishPandeyy)https://t.co/CEMJj9ruR0
— AajTak (@aajtak) November 2, 2022
‘मुख्यमंत्री सोरेन यांचे सहकारी आमदार पंकज मिश्रा यांच्या संदर्भातील अन्वेषणात काही तथ्ये समोर आली असून त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे’, असे ‘ईडी’च्या एका अधिकार्याने सांगितले. पंकज मिश्रा यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल १ सहस्र कोटी रुपयांचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ‘ईडी’ने विशेष न्यायालयात दिली.