कास (जिल्‍हा सातारा) परिसरातील १५५ बांधकामे अधिकृत करण्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश !

राज्‍यातील प्रसिद्ध पर्यटनस्‍थळ कास (जिल्‍हा सातारा) आणि परिसरातील येथील १५५ मिळकतधारकांनी केलेली बांधकामे अधिकृत करण्‍यात यावीत, असे आदेश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नाशिक महापालिका ‘एस्.टी.पी. प्लांट’चे ‘अमृत योजने’च्या माध्यमातून होणार आधुनिकीकरण !

विधानसभेत आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी स्वच्छतेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील शिंदे आणि ठाकरे गट यांची सर्वोच्च न्यायालयात चालू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात !

१५ मार्च या दिवशी झालेल्या सुनावणीत ‘तत्कालीन राज्यपालांची भूमिका ही संविधानाच्या चौकटीत होती’ असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.

विधानभवनाच्या पायर्‍या सोडून अन्यत्र उपोषण करण्याची प्रथा नको ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघातील पाणी योजनेचे ५० टक्के रखडलेले काम चालू करावे, या मागणीसाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण चालू केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे विधानमंडळाच्या कार्यालयाकडून परिपत्रक !

अशा हास्यास्पद गंभीर चुका करणारे प्रशासन राज्यकारभार कसा करत असेल, याची कल्पना येते !

जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जैन समाज हा दुसर्‍यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. जैन समाजाने संकटप्रसंगी देशाला भरभरून साहाय्य केले आहे. समाजाप्रती त्यांची लोककल्याणकारी भावना सर्वांना ठाऊक आहे, असे गौरवोद्गाार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.

चिपळूण येथे अद्ययावत रुग्णालय उभारावे !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसणे, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी शिवसेना नेते रामदास कदम यांचे उद्गार !

उद्धव ठाकरे यांनी आमचा धसका घेतला आहे. त्यामुळे खेडमध्ये बाहेरची माणसे आणून विराट सभेचा दिखावा केला जात आहे. त्याच मैदानात सभा आम्ही १९ मार्चला घेणार असून या सभेला व्याजासहित उत्तर देऊ.

नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याने त्यांना उद्देशून देशद्रोही म्हटले ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची सिद्धता केल्यानंतर विरोधकही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

तुटक्या एस्.टी.वर विज्ञापन दिल्याप्रकरणी निलंबित केलेल्या ‘एस्.टी’च्या कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्यावे ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यशासनाने विज्ञापनांऐवजी ‘एस्.टी’च्या दुरुस्ती, देखभाल आणि कर्मचारी यांच्या हितासाठी पैसा वापरावा !