विधानसभा वृत्त

मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघातील पाणी योजनेचे ५० टक्के रखडलेले काम चालू करावे, या मागणीसाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांच्या पाणी योजनेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी संमत झाला होता; मात्र कुणीतरी तक्रार केली म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती कशासाठी ? त्यामुळे या प्रश्नी देशमुख यांच्याकडे शासनाचा प्रतिनिधी पाठवून २ दिवसांत अहवाल द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १४ मार्च या दिवशी विधानसभेत केली. याला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशमुख यांच्या तक्रारीची पडताळणी करू; मात्र विधानभवनाच्या पायर्यांवर आतापर्यंत बर्याच लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले आहे. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची नवीन प्रथा कुणी पाडू नये. ही पद्धत अयोग्य आहे.
अकोल्यातील बाळापूरचा पाणी प्रश्न पेटला, देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाविरोधात आमदार नितीन देशमुखांचे आमरण उपोषण #nitindeshumkhhttps://t.co/HIJLY4P6ew
— ABP माझा (@abpmajhatv) March 14, 2023
संपादकीय : ‘कॉकरोच’वर शाईफेक !
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !