शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार !

६ जून या दिवशी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे.

मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मंत्रीमंडळाविषयी अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहा सकारात्मक आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.

पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणार्‍या वाहनांना पथकर माफ !

पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणार्‍या आणि परतीचा प्रवास करणार्‍या वाहनांचा पथकर माफ करण्‍यात येणार आहे, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वृद्ध भाविकांना दर्शनासाठी विशेष सुविधा करण्‍याची सूचनाही त्‍यांनी पंढरपूर मंदिर प्रशासनाला केली आहे.

रायगडावर शिवराज्याभिषेकदिनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह शिवप्रेमींनी घेतली शपथ !

छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या राज्यकारभारामुळे ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेले हिंदवी राज्य जनकल्याणकारी होते. छत्रपती शिवराय यांच्या कल्पनेतील सुराज्य आम्हाला आणायचे आहे.

गोसीखुर्द जलाशय (जिल्‍हा भंडारा) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या माध्‍यमातून भंडारा जिल्‍ह्यातील गोसीखुर्द जलाशय येथे नैसर्गिक विविधता, मोठी बेटे आणि बंदर यांची उपलब्‍धता आहे. त्‍यामुळे हे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

रायगडावरील ‘गाईड्‌स’ना शिवसेनेकडून दिले जाणार आरोग्‍य विम्‍याचे संरक्षण !

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वर्षानुवर्षे सांगणार्‍या २२ गाईड्‍सना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्‍या वतीने वार्षिक ५ लाख रुपयांचे आरोग्‍य विम्‍याचे संरक्षण दिले जाणार आहे.

अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण !

‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवून आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यामुळे आम्ही अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

सर्व विभागांमध्‍ये राज्‍य आपत्ती प्रतिसाद दल नियुक्‍त करावे ! – मुख्‍यमंत्री

राष्‍ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक आपत्तीच्‍या वेळी राज्‍यात प्रत्‍येक ठिकाणी वेळेत पोचू शकत नाहीत. त्‍यामुळे राज्‍यात सातही विभागांच्‍या ठिकाणी राज्‍य आपत्ती प्रतिसाद दल नियुक्‍त करावे, असा आदेश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

सावरकर जयंतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्घाटन केल्यामुळेच काही पक्षांचा उद्घाटनला विरोध ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे महान क्रांतीकारक होते. ते साहित्यिक आणि समाजसुधारकही होते.

१३ वर्षे बेपत्ता असलेल्या सैनिकाला शोधू न शकणे, हे सरकारला लज्जास्पद !

सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला आमच्याकडे सोपवावे’, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे वडील भागवत पाटील आणि आई बेबीताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.