पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणार्‍या वाहनांना पथकर माफ !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणार्‍या आणि परतीचा प्रवास करणार्‍या वाहनांचा पथकर माफ करण्‍यात येणार आहे, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वृद्ध भाविकांना दर्शनासाठी विशेष सुविधा करण्‍याची सूचनाही त्‍यांनी पंढरपूर मंदिर प्रशासनाला केली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे १ जून या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीच्‍या निमित्ताने प्रशासनाकडून देण्‍यात येणार्‍या सोयीसुविधांचा आढावा घेतला. या वेळी मुख्‍यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. या बैठकीला उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्‍थित होते.