ठाणे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू !
समृद्धी महामार्गावर येथील शहापूरमधील सरंळाबे येथे पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. क्रेनद्वारे काम चालू असतांना क्रेन आणि गर्डर दोन्ही कोसळले.
समृद्धी महामार्गावर येथील शहापूरमधील सरंळाबे येथे पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. क्रेनद्वारे काम चालू असतांना क्रेन आणि गर्डर दोन्ही कोसळले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांच्या ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न करणारा चालक जी.पी. रझाक याला वांद्रे पोलिसांनी नुकतीच अटक केली.
राज्यशासन महिलांसाठी ९९ हून अधिक योजना आणणार आहे. राज्यात एकूण ५४ सहस्र महिला बचत गट आहेत. यामध्ये ६० लाख महिला जोडलेल्या आहेत. या सर्व बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘युनिटी मॉल’ ही संकल्पना शासन राबवणार आहे.
कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ३ कोटी रुपयांचा निधी सुपुर्द करण्यात आला.
इरशाळवाडी येथे परिसरात दुर्गंधी येत आहे. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे.
या भेटीत इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्या ठिकाणच्या साहाय्य कार्याविषयी पंतप्रधानांना माहिती दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या दुःखद घटनेविषयी पंतप्रधानांनी सहवेदना व्यक्त करत सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
इरशाळवाडीमधील बाधित कुटुंबियांची तात्पुरती कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व कुटुंबांची कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मोरबे धरणाच्या परिसरात वरील बाजूस इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडी या गावात रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान डोंगरावरून भली मोठी दरड खाली कोसळली. या दुर्घटनेत ३० ते ४० घरे नागरिकांसह गाडली गेली.
श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे झालेल्या वारकरी महाअधिवेशनामध्ये सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याची, तसेच मंदिर विश्वस्त आणि गड-दुर्ग यांच्या संदर्भात गडप्रेमी संघटनांची बैठक बोलवण्याची मागणी केली.
गरीब रुग्णांना रुग्णसेवेची अट घालून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांसाठी महानगरपालिकेने जागा दिली; मात्र खासगी रुग्णालयांकडून त्याचे उल्लंघन होत असून पालिका रुग्णालये सुविधा पुरवण्यात अपुरी पडत आहेत.