
मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – राज्यशासन महिलांसाठी ९९ हून अधिक योजना आणणार आहे. राज्यात एकूण ५४ सहस्र महिला बचत गट आहेत. यामध्ये ६० लाख महिला जोडलेल्या आहेत. या सर्व बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘युनिटी मॉल’ ही संकल्पना शासन राबवणार आहे. बचत गटांच्या वस्तूंची विक्री करण्याचे दायित्व राज्यशासन उचलणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ जुलै या दिवशी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘महिला बचत गटांनी केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात येईल. या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य भाव मिळणे याचे दायित्व सरकार घेणार आहे. बचत गटांसाठी सरकार पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देईल.’’
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन