नवीन शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीसाठी विद्यापिठात स्वतंत्र कक्ष स्थापन करणार ! – कुलगुरु डॉ. कारभारी काळे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी घोषित केले.

फरिदाबाद (हरियाणा) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण

शाळेचे संचालक श्री. ललित गुप्ता यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने घेतलेला उपक्रम अतिशय चांगला झाला’, असे सांगितले.

देशात प्रथमच मध्यप्रदेशात हिंदीतून वैद्यकीय शिक्षण मिळणार !

जे स्वातंत्र्यानंतर व्हायला हवे होते, ते आता कुठेतरी चालू होत आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात ५८५ अवैध मदरसे !

एका जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मदरसे असतील, तर राज्यात आणि पूर्ण देशात किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !

टीईटी परीक्षेतील घोटाळ्यात दोषी आढळलेल्यांना पुन्हा परीक्षा देता येईल ! – शिक्षणमंत्री केसरकर

टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेतील घोटाळ्यात जे दोषी आढळले त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. काही वर्षांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल; मात्र त्याआधी आता जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

पुणे येथे डेक्कन महाविद्यालय संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या वतीने ‘खुला दिवस’ साजरा !

वेद, वेदांत, दर्शन, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कृषिशास्त्र, शिल्पशास्त्र अशा तब्बल ६२ विद्याशाखांमधून अनेक शब्दांचे आणि त्यांच्या संदर्भांचे संकलन, त्याची रचना अन् त्यांचे अर्थ ऐतिहासिक क्रमाने दिले जातात, हे या विश्वकोशाचे वैशिष्ट्य आहे.

‘भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’त शास्त्रीय संगीत, बासरी, तबला, सतार, हार्मोनियम आणि संगीतनिर्मिती यांवर अभ्यासक्रम चालू होणार !

महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य निर्णय !

येत्या डिसेंबरपासून कर्नाटकात नैतिक मूल्यांतर्गत शाळांमधून श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यात येणार !

कुराण हा धार्मिक ग्रंथ; मात्र गीता धार्मिक ग्रंथ नाही ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याविषयी मंत्री अतुल सावे यांचा सकारात्मक प्रतिसाद !

महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये (‘महाज्योती’) विद्यार्थ्यांसाठीच्या ‘टॅबलेट’ खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.

सामुदायिक कॉपीप्रकरणी सोलापूर येथील ३१९ विद्यार्थी १ वर्षासाठी निलंबित !

मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! कॉपी करणार्‍या सर्वत्रच्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कारवाई केल्यास कॉपी प्रकरणांवर आळा बसेल !