सामुदायिक कॉपीप्रकरणी सोलापूर येथील ३१९ विद्यार्थी १ वर्षासाठी निलंबित !

सोलापूर – ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन’कडून (एम्.एस्.बी.टी.ई.) जून ते जुलै या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षेत मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयातील इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा यांच्या ३१९ विद्यार्थ्यांना सामुदायिक कॉपी केल्याच्या प्रकरणी एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

१. या प्रकरणी ‘प्रहार संघटने’ने विद्यार्थ्यांची बाजू घेत निलंबित सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून बोर्डाच्या मुख्यालयाकडे आंदोलनासाठी घेऊन जाण्याचे नियोजन केले. हे वृत्त समजताच पोलिसांनी हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांसह प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बस स्थानकावरून कह्यात घेतले.

२. ‘एम्.एस्.बी.टी.ई.’कडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शहरातील मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयात डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या प्रथम ते तृतीय वर्गातील ५९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत उत्तरपत्रिका पडताळणीच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका एकसारख्या असल्याचे लक्षात आले. हा सामुदायिक कॉपीचा प्रकार असल्याचे समोर आले.

संपादकीय भूमिका 

मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! कॉपी करणार्‍या सर्वत्रच्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कारवाई केल्यास कॉपी प्रकरणांवर आळा बसेल !