कर्नाल (हरियाणा) – ब्रिटीश राजवटीपूर्वी देशातील ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती, तसेच त्या वेळी बेरोजगारीही नव्हती. दुसरीकडे इंग्लंडमध्ये केवळ १७ टक्के लोक शिक्षित होते. ब्रिटिशांनी त्यांची शिक्षण पद्धत भारतात आणि आपली शिक्षण पद्धत त्यांच्या देशात लागू केली. त्यामुळे ब्रिटीश ७० टक्के आणि आम्ही १७ टक्के शिक्षित झालो, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे एका रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या वेळी केला.
संघ प्रमुख मोहन भागवत बोले, अंग्रेजों ने भारत की शिक्षा प्रणाली को किया ध्वस्तhttps://t.co/de22Q0PVl2#educationsystem #MohanBhagwat #RSS #EducationSystem
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) March 6, 2023
सरसंघचालक पुढे म्हणाले की,
१. भारताची शिक्षणव्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ज्ञानाचेही माध्यम होती. सर्वांना स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध होते. त्यामुळे शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला होता. या शिक्षणातून पुढे आलेले अनेक कलाकार, विद्वान मंडळी जगभर ओळखली गेली.
#WATCH | Before British rule, our country’s 70% population was educated& there was no unemployment.Whereas in England only 17% people were educated.They implemented their edu model here&implemented our model in their country& became 70% educated &we became 17% educated: RSS chief pic.twitter.com/JnSZX6KtGK
— ANI (@ANI) March 5, 2023
२. सर्वांसाठी वैद्यकीय उपचार आणि शिक्षण ही देशासाठी महत्त्वाची गोष्ट आहे; कारण वैद्यकीय उपचार आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी महाग होत चालल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकाला स्वस्त दरात वैद्यकीय उपचार आणि शिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे.