लाच स्वीकारतांना मुख्याध्यापिकेसह शिक्षक पोलिसांच्या कह्यात !

प्रतिकात्मक छायाचित्र

कराड – शिक्षण विभागाच्या वतीने शाळेच्या वार्षिक तपासणीसाठी झालेल्या खर्चाची रक्कम शाळेतील शिक्षकांकडून वसूल करण्यात आली. १ सहस्र ८७५ रुपय लाच स्वीकारतांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उंब्रज तालुक्यातील कराड येथील ‘आदर्श प्राथमिक विद्यामंदिर’ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला रघुनाथ पोळ आणि शिक्षक बापू सर्जेराव सूर्यवंशी या दोघांना रंगेहात कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. शिक्षण विभागाच्या अन्वेषणासाठी आलेल्या पथकाची शाळेकडून जेवणासह इतर सरबराई करून खर्च करण्यात आला. शाळेला चांगला शेरा मिळावा, यासाठी झालेला खर्च शाळेतील इतर शिक्षकांना देण्यास सांगितले. यावरून महिला शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या घटनेनंतर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

संपादकीय भूमिका

  • शिक्षण संस्थेला काळीमा फासणारी घटना ! असे लाचखोर शिक्षक विद्यार्थ्यांना काय घडवणार ?