अघोरी युती !
रशिया आता अवलंबत असलेली युद्धनीती आणि त्याला चीनचे असलेले समर्थन ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
रशिया आता अवलंबत असलेली युद्धनीती आणि त्याला चीनचे असलेले समर्थन ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
राष्ट्रासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारा, मुत्सद्दी आणि मुख्य म्हणजे आपले मित्र अन् शत्रू कोण ? याची उत्तम जाण असणार्या नेत्याच्या हाती राष्ट्र सोपवणे का आवश्यक असते, हे अधोरेखित झाले. झेलेंस्की यांनी ज्यांना मित्र म्हटले, त्यांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली….
‘बळी तो कान पिळी’, हाच जगाचा नियम आहे. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास पूर्वीचे राजे चक्रवर्ती होते आणि संपूर्ण पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. इंग्रजांच्या काळात लचके तोडले गेले. एकाच वेळी चीन आणि पाकिस्तान यांना धूळ चारायची असेल, तर भारताने स्वयंसिद्ध होणे अपरिहार्य ! अशाने भारताला गतवैभव मिळवणे शक्य होईल !
मोठा गाजावाजा करून कारवाई चालू करायची, थोडे केल्यासारखे काहीतरी दाखवायचे आणि नंतर साटेलोटे झाले की, काढता पाय घ्यायचा, हे या तरी प्रकरणात होऊ नये. भारतीय जनतेला विसराळूपणाचा शाप आहे. आपल्याकडे मोठी प्रकरणेही एवढी घडत असतात की, पुढचे काही घडले की, जनता जुने सर्व विसरून जाते.
दुर्दैवाने आज आपल्या देशात एकीकडे क्रिकेटसारख्या विदेशी आणि अत्यंत खर्चिक खेळाचे स्तोम माजले असतांना दुसरीकडे बुद्धीबळ, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ शासकीय पातळीवर वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. अशा देशी खेळांना जर खर्या अर्थाने राजाश्रय मिळाला, तर देशात अनेक ‘प्रज्ञानंद’ निर्माण होऊन देशाचे नाव उंचावतील !
सध्या फुटीरतावाद्यांनी भारतात कधी नव्हता इतका कहर केला आहे. आतंकी, धर्मांध, नक्षली, बोडो, खलिस्तानी, ‘तुकडे गँग’, पुरोगामी आणि त्यांना साथ देणारे हिंदुविरोधी राजकीय पक्ष अन् प्रसारमाध्यमे यांच्यामुळे ‘युद्धकाळात अंतर्गत शांतता बिघडली’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. भारतियांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे आवश्यक !
राष्ट्राच्या संदर्भात निर्णय घेतांना ‘जग काय म्हणेल?’, असा विचार केला जात नाही. अमेरिका, रशिया, इस्रायल यांसारखे देश असा विचार करतांना कधीच दिसत नाहीत. ते ‘राष्ट्र सर्वाेपरि’ असाच विचार करून निर्णय घेतात आणि कृतीही करतात. इतकेच नव्हे, तर जागतिक व्यासपिठावर स्वतःची शक्ती दाखवून देतात. भारत स्वतःच्या संदर्भातही असा वागत नाही, हे अपेक्षित नाही.
जमियत आणि पीएफआय यांच्या कृतीतून भारतातील शासनव्यवस्था उद्ध्वस्त करून इस्लामी व्यवस्था स्थापण्याचे छुपे मनसुबे उघड होतात. भारतीय समाज ‘या संघटनांवर कारवाई होईल’, या आशेवर असाहाय्य होऊन पहात आहे, तेव्हा मोदी सरकारने भारतियांचा आक्रोश लक्षात घेऊन जमियतवर कारवाई करून देश सुरक्षित करावा, ही अपेक्षा !
भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी अरविंद नेगी यांच्यावर आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा होणारा आरोप पहाता त्यांच्या चौकशीतून देशातील हिंदुविरोधी षड्यंत्र बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. अन्वेषण यंत्रणांनी याची कसून चौकशी करून देशवासियांपुढे सत्य ठेवावे, अशी अपेक्षा आहे.
सिंगापूरप्रमाणे कठोर कायदे कार्यान्वित करण्याची धमक भारतीय राजकारण्यांमध्ये आहे का ?