हासन (कर्नाटक) येथे रेव्ह पार्टीवर घातलेल्या धाडीत महिला पोलीस शिपायाला अटक !

ज्यांनी कायद्याचे रक्षण करावे, तेच कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? अशांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

अमली पदार्थांची तस्करी आणि तटरक्षक दलाचे यश !

चीन किंवा पाकिस्तान हे इतर देशांच्या साहाय्याने भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रे पाठवणार होते; परंतु या बोटी किनारपट्टीवर पोचण्यापूर्वीच पकडण्यात आल्या. त्यामुळे एक मोठा घातपात टळला.

अमली पदार्थ व्यवसाय दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात अधिक कळंगुट, हणजूण आणि पेडणे पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंद

उत्तर गोव्यात अमली पदार्थाचे सेवन करणारे केवळ पर्यटकच नव्हे, तर स्थानिक नागरिकही आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील गतवर्षीच्या दळणवळण बंदीचा गोव्यातील अमली पदार्थ व्यवसायावर पुष्कळ अल्प परिणाम !

अमली पदार्थ व्यवसाय करणार्‍यांवर या महामारीच्या वर्षांत पोलीस, गोवा पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि अमली पदार्थविरोधी पथके यांनी मिळून जवळजवळ ९०० धाडी घातल्या.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या पलायनामध्ये कारागृहातील कर्मचार्‍यांचा हात असल्याचा अन्वेषण यंत्रणेला संशय

अन्वेषण यंत्रणेला कारागृहातील कर्मचार्‍यांच्या विरोधात मोठी माहिती मिळाली आहे.

नंदुरबारमध्ये अफू लागवड : कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा ?

नंदुरबार जिल्ह्यात थेट अफूची शेती करण्याचे धाडस करणारे सूत्रधार कोण ? हा प्रश्‍न महत्वाचा आहे. सध्याच्या विविध प्रकारच्या तस्करींवर एकही लोकप्रतिनिधी ‘ब्र’ काढत नाही, हे वास्तव आहे.

श्रीलंकेच्या नौकेमधून ३०० किलो हेरॉईन, ५ एके-४७ रायफली जप्त

हे साहित्य इराणमधील चाबाहार बंदरावरून आले होते. हे साहित्य लक्षद्वीप येथे श्रीलंकेच्या नौकेवर ठेवण्यात आले, जे नंतर श्रीलंकेला नेण्यात येणार होते.

दाऊदचा मुंबईतील अमली पदार्थांचा हस्तक दानीश चिकणा याला अटक

अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.

वर्ष २०१७ पासून राज्यात अमली पदार्थांवरील कारवाईची एकूण ७७५ प्रकरणे नोंद

केवळ गुन्हे नोंदवून अमली पदार्थ व्यवसाय बंद होणार नाही. त्यासाठी कायदेही तसेच सक्षम बनवावे लागतील

अशा प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा !

होळीमध्ये लोक मद्यपान करतात. तो अमली पदार्थांचे सेवन करण्याचाही उत्सव आहे. याची माहिती मिळाली, तर पोलिसांना द्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशातील फरुखाबादचे दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.