महाराष्‍ट्रात गुटखाबंदी केवळ कागदावरच आहे का ?

देश महासत्तेकडे वाटचाल करत असतांना सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. गुटखा तस्‍करी आणि विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई आवश्‍यक आहे.

‘ड्रग्‍ज’च्‍या विरोधात विरोधकांचे आंदोलन !

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाविकास आघाडीच्‍या आमदारांनी विधानभवनाच्‍या पायर्‍यांवर विरोधकांनी घोषणा दिल्‍या.

‘पुष्पा २’ चित्रपटामध्ये दारू आणि तंबाखू यांचे विज्ञापन करण्यास अभिनेते अल्लू अर्जुन यांचा नकार !

अशा प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे विज्ञापन नाकारणारे किती अभिनेते, खेळाडू किंवा नामांकित लोक आज भारतात आहेत ?

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अँटी नार्काेटिक टास्क फोर्स’ स्थापन करणार !  – देवेंद्र फडणवीस

कायद्यातील काही अडचणींमुळे अमली पदार्थविरोधी कारवायांना मर्यादा पडतात. यामध्ये गुन्हा सिद्ध झाला, तरच आपल्याला कारवाई करता येते.

गोव्याभोवतीचा अमली पदार्थांचा विळखा आणखी घट्ट : ‘सनबर्न’ला थारा नकोच !

मागील काही वर्षांमध्ये गोव्यातील शहरी भागासमवेत ग्रामीण भागांमध्येही पोलिसांनी धाडी घालून अमली पदार्थ जप्त केले आहेत.

रायगड येथून वर्षभरात ८ सहस्र किलो गांजा, २१९ किलो चरस आणि ३१४ किलो मेफेड्रॉन जप्त !

ही संख्या पहाता समाज किती मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला आहे, हेच यातून लक्षात येते ! व्यसनांचा वाढता विळखा नष्ट करण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांनी ठोस पावले उचलायला हवीत !

Drug Racket : मोरजी (गोवा) येथे १ कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह रशियाचा नागरिक कह्यात

अमली पदार्थविरोधी पथकाला मोरजी येथे अमली पदार्थाचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

नाशिकमध्ये भ्रदकाली परिसरात अल्पसंख्यांकाडून अवैध धंदे चालू ! – आमदार नीतेश राणे, भाजप

शटर बंद करून रात्री उशिरापर्यंत अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी व्हिडिओचे पुरावेही पाठवले आहेत.

शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांना ‘मोकका’ लावू – धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

शाळांमधील विद्यार्थी नकळत व्यसनाकडे ओढला जाऊ नये, याकरता विद्यार्थ्यांचे पालक, मुख्याध्यापक, शाळा कृती समितीचे पदाधिकारी यांना सतर्क रहाण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुंबईत अमली पदार्थ विक्रेते पोलिसांना भीक घालत नाहीत ! – आमदार सुनील प्रभु, ठाकरे गट

मुंबईसह महाराष्ट्रात अमली पदार्थांचे जाळे पसरले आहे. दिंडी, आरे, कुराड आदी परिसरात अमली पदार्थ सेवन करणारे रस्त्यावर उभे राहून महिलांना त्रास देतात.