व्युत्पत्ती आणि अर्थ
‘दिवाळी’ हा शब्द ‘दीपावली’ या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात.
इतिहास
१. १४ वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव चालू आहे.
२. बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कुणाला काय, केव्हा आणि कुठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलीराजा कुणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्रीविष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा लहान असतो आणि तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्या पायाने अंतरिक्ष व्यापले आणि त्याने ‘‘तिसरा पाय कुठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा म्हणाला, ‘‘तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालवणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी ३ दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभु, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा.’ ते ३ दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.
अंतर्भूत दिवस
आश्विन कृष्ण त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन कृष्ण चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे ४ दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, ‘दिवाळी उरलेल्या ३ दिवसांची आहे’, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः ते सण वेगवेगळे आहेत.
दीपावलीचा भावार्थ
‘श्रीकृष्णाने आसुरी वृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला भोगवृत्ती, लालसा, अनाचार आणि दुष्टप्रवृत्ती यांपासून मुक्त केले आणि प्रभुविचार (दैवी विचार) देऊन सुखी केले, तीच ही ‘दीपावली’. आपण वर्षानुवर्षे केवळ एक रूढी म्हणून दीपावली साजरी करत आहोत. आज त्यातील गुह्यार्थ लोप पावला आहे. हा गुह्यार्थ लक्षात घेऊन त्यातून अस्मिता जागृत झाल्यास अज्ञानरूपी अंधकाराचे, तसेच भोगवृत्ती आणि अनाचारी, वाईट वृत्ती असलेल्या लोकांचे प्राबल्य अल्प होऊन त्यांचे सज्जनशक्तीवरील वर्चस्व न्यून होईल.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)
#दिवाळी #diwali diwali दिवाळी #दिवाळी२०२२ #diwali2022 diwali2022 दिवाळी २०२२ #दीपावली #deepawali deepawali दीपावली #दीपावली२०२२ #deepawali2022 deepawali2022 दीपावली २०२२ #दीप #deep deep दीप #लक्ष्मीपूजन #lakshmipoojan #laxmipoojan lakshmipoojan laxmipoojan लक्ष्मीपूजन #आकाशकंदील #akashkandil akashkandil आकाशकंदील #नरकचतुर्दशी #narakchaturdashi narakchaturdashi नरकचतुर्दशी #पाडवा #padwa padwa पाडवा #भाऊबीज #bhaubeej bhaubeej भाऊबीज #भाईदूज #bhaidooj भाईदूज bhaidooj #भाईदूज२०२२ #bhaidooj2022 bhaidooj2022 भाईदूज२०२२ #भाऊबीज२०२२ #bhaubeej2022 भाऊबीज२०२२ bhaubeej2022