‘दीप’

‘दीप’ शब्दाची व्याख्या : ‘दीप्यते दीपयति वा स्वयं परं चेति ।’ म्हणजे ‘स्वतः प्रकाशतो आणि दुसर्‍यांना प्रकाशित करतो तो दीप.’

बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक : दीप किंवा दीपज्योत हे बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अज्ञानरूपी तिमिराकडून ज्ञानरूपी प्रकाशज्योतीकडे ने’, असा त्याचा अर्थ आहे.

शरिरातील जीवनतत्त्वाला, चैतन्याला ‘प्राणज्योत’, म्हटले आहे. ही प्राणज्योत तेवेपर्यंतच जीवन आहे.

(संदर्भ : ‘आदिमाता’)