हिंदूंनो, ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !

‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घाला !

अलीकडे ‘हलाल’ हे चिन्ह असलेली उत्पादने बाजारात मोठ्या प्रमाणात मिळू लागली आहेत. हे चिन्ह म्हणजे ‘हलाल’ हे प्रमाणपत्र त्या उत्पादनाच्या आस्थापनाला प्राप्त झाले आहे.

हे प्रमाणपत्र घेण्यासाठी ‘हलाल इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ यांसारख्या इस्लामी संस्थांना शुल्क द्यावे लागते. मग त्यांच्याकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ दिले जाते. या हलाल प्रमाणपत्रासाठी प्रथम २० ते ६० सहस्र रुपये आणि प्रतिवर्षी नूतनीकरणासाठी १५ सहस्र रुपये घेतले जातात. हा पैसा आतंकवादी कारवायांसाठी पुरवला जातो. हे प्रमाणपत्र देणार्‍या संघटनांपैकी काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्मांधांना सोडवण्यासाठी न्यायालयीन साहाय्य करत आहेत.

‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार ‘वैध’, असा आहे. मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था अशा अनेक गोष्टींत केली जात आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे आजही धर्मनिरपेक्ष भारतात ‘भारतीय रेल्वे’, ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या सरकारी आस्थापनांतही ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच दिले जात आहेत.

इस्लामी देशात हे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने विविध आस्थापनांकडून ते घेतले जाते. वास्तविक धर्मनिरपेक्ष भारतात सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’कडून (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’कडून) प्रमाणपत्र घेतल्यावर भारतात हे खासगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची आस्थापनांना काहीच आवश्यकता नाही आणि विशेषतः शाकाहारी उत्पादनांसाठी ते घेणे हे तर हास्यास्पदच आहे !

भारतातील जागरूक नागरिकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, यातून निर्माण होत असलेली ‘हलाल’ची समांतर अर्थव्यवस्था मोडून काढणे अत्यावश्यक आहे. हे असेच चालू राहिले, तर ही भारताची ‘इस्लामीकरणा’कडे वाटचाल होणे शक्य होणार आहे. इंग्लंडमधील विद्वान निकोलस तालेब यांनी याला ‘मायनॉरिटी डिक्टेटरशिप’ (अल्पसंख्यांकांची हुकूमशाही) असे म्हटले आहे.

शुद्ध शाकाहारी ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, धान्य, तेल यांसह साबण, शँपू, टूथपेस्ट, काजळ, लिपस्टिक आदी सौंदर्यप्रसाधनेही ‘हलाल प्रमाणित’ होऊ लागली आहेत. ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘डॉमिनोज’ यांसारखी विदेशी आस्थापने भारतात सगळ्याच ग्राहकांना ‘हलाल’ खाऊ घालत आहेत.

हलाल प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेद्वारे मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न शासनाला न मिळता काही इस्लामी संघटनांना मिळत आहे. निधर्मी भारतात अशी ‘धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.

(संदर्भ – दैनिक ‘सनातन प्रभात’, २८.१०.२०२१)


हिंदूंनो, या दिवाळीत हे कराच !

  • ‘मॅकडोनाल्ड’, ‘केएफसी’ आणि ‘डॉमिनोज्’चे खाद्यपदार्थ यांच्यावर बहिष्कार घाला !
  • चिनी आस्थापनांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला !
  • कुठले उत्पादन किंवा खाद्यपदार्थ खरेदी करतांना प्रथम त्याच्या वेष्टनावर ‘हलाल’ असे लिहिलेले चिन्ह नाही ना, याची निश्चिती करा आणि तसे असल्यास ते उत्पादन खरेदी करू नका आणि संबंधित दुकानदाराचेही प्रबोधन करा !

(संदर्भ – दैनिक ‘सनातन प्रभात’, २८.१०.२०२१)


हे पहा –

हलाल को दो हलाला वाला झटका – Jamboo Talks

 _____________________________