मथुरा येथे साधकांच्या निवासाच्या बाहेर लावलेल्या सनातन संस्थेच्या नवीन आकारातील आकाशकंदिलाच्या भोवती पांढरी प्रभावळ दिसणे

सनातन संस्थेचा नवीन आकारातील आकाशकंदिल

‘२९.१०.२०२४ या दिवशी (वसुबारस) संध्याकाळी मी प्रार्थना करून मथुरा येथील निवासासमोर आकाशकंदिल लावला. त्यानंतर आकाशकंदिलाचे छायाचित्र काढले. तेव्हा आकाशकंदिलाच्या चारही बाजूंनी गोल पांढरी प्रभावळ दिसली. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला ही अनुभूती आली. त्याबद्दल मी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

श्री. प्रणव मणेरीकर

या वर्षी प्रथमच सनातन संस्थेने या आकाराचा आकाशकंदिल सिद्ध केला आहे. जो अतिशय सात्त्विक आणि मनाला आनंद देणारा आहे.’

– श्री. प्रणव मणेरीकर, मथुरा (२९.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक