सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास दिला नकार !

आता केंद्र सरकारनेच त्या ठिकाणी उत्खनन करून सत्य इतिहास लोकांसमोर आणावा, अशीच हिंदु समाजाची अपेक्षा आहे. असे केल्यास अशा याचिका पुनःपुन्हा प्रविष्ट केल्या जाणार नाहीत !

जगातील सर्वांत प्रदूषित देशांमध्ये भारत ५ व्या क्रमांकावर !

विदेशी आस्थापनांनी सिद्ध केलेले अशा प्रकारचे अहवाल किती खरे असतात, याचाही आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. पाश्‍चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, हे जगजाहीर असतांना विकसनशील देशांना प्रदूषणासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे !

इस्रायली दिग्दर्शक लॅपिड यांच्या ‘कश्मीर फाइल्स’विषयीच्या विधानाला अन्य ३ परीक्षकांचे समर्थन !

लॅपिड यांनी त्यांच्या विधानावरून क्षमा मागिल्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारे अन्य ३ परीक्षकांनी म्हणणे म्हणजे हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे, असेच वाटू लागले आहे ! याचा आता केंद्र सरकारने शोध घेणे आवश्यक आहे !

जे.एन्.यू.च्या भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य यांच्या विरोधात लिहिण्यात आल्या घोषणा !

सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार्‍या या विश्‍वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे ! केंद्र सरकारने ते धाडस दाखवण्याची वेळ आता आली आहे !

विश्‍व हिंदु परिषद देशात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी चळवळ राबवणार

विश्‍व हिंदु परिषदेने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्याची घोषणा केली आहे. यासह परिषदेने या संदर्भात केंद्र सरकारने कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे.

शाहरुख खान मूर्तीपूजा करत असल्याचा आरोप करत धर्मांध मुसलमानांकडून सामाजिक माध्यमांद्वारे त्यांना विरोध !

हिंदु सर्वधर्मसमभावाने वागतात आणि अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टींचा सन्मान करतात; मात्र अन्य धर्मीय तसे करत नाहीत, हेच वेळोवेळी दिसून येते आणि निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी यावर मौन बाळगतात !

देशात कोरोना संपण्याच्या उंबरठ्यावर !

एप्रिल २०२२ नंतर २ डिसेंबर या दिवशी प्रथमच देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अगदी नगण्य नोंदवली गेली आहे. देशात २ डिसेंबरला कोरोनाचे केवळ २७५ रुग्ण आढळून आले आहेत.

काश्मीर अविभाज्य भाग बनवण्यात भारत यशस्वी ! – अल् कायदाचा जळफळाट

अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.

आधारकार्डप्रमाणेच जन्म प्रमाणपत्रही अनिवार्य होणार

शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, मतदारसूचीत समावेश, केंद्र आणि राज्य सरकारी नोकर्‍यांमध्ये नियुक्ती, वाहन अनुज्ञप्ती आणि पासपोर्ट मिळवणे, यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य कागदपत्र बनवण्याचे काम सध्या चालू आहे.

एन्.डी.टी.व्ही.’चे प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांचे प्रवर्तक पदाचे त्यागपत्र

‘एन्.डी.टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीचे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक आस्थापन ‘आर्.आर्.पी.आर्. होल्डिंग्ज’च्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचे त्यागपत्र दिले. अदानी समूहाला आस्थापनाच्या मालकीचा काही भाग विकला आहे.