आधारकार्डप्रमाणेच जन्म प्रमाणपत्रही अनिवार्य होणार

नवी देहली – शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, मतदारसूचीत समावेश, केंद्र आणि राज्य सरकारी नोकर्‍यांमध्ये नियुक्ती, वाहन अनुज्ञप्ती आणि पासपोर्ट मिळवणे, यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य कागदपत्र बनवण्याचे काम सध्या चालू आहे. याविषयीच्या नवीन विधेयकाच्या मसुद्यानुसार, जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदा, १९६९ मध्ये सुधारणा केली जाऊ शकते.

हे विधेयक संसदेच्या ७ डिसेंबरपासून चालू होणार्‍या संसदेच्य हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.