३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक !

केंद्रशासनाने संसदेत माहिती देतांना ‘देशात अनुमाने २०० चिनी आस्थापने ‘विदेशी आस्थापने’ म्हणून नोंदणीकृत आहेत. यासह देशातील ३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक आहेत’, असे सांगितले.

आनंदी जीवनासाठी व्यक्तीमत्त्वातील दोष शोधून दूर करणे आवश्यक ! – कु. कृतिका खत्री, सनातन संस्था

आज आपल्या जीवनात तणावाची विविध कारणे आहेत. तणावमुक्त रहाण्यासाठी प्रतिदिन काही वेळ आत्मनिरीक्षण केले पाहिजे. आपल्या स्वत:च्या कृतींचे निरीक्षण करून आम्ही कुठे कुठे अयोग्य कृती किंवा चुकीचे आचरण केले, याचे निरीक्षण केले पाहिजे.

मोरोक्कोच्या मुसलमान फुटबॉल खेळाडूची पत्नी बुरखा आणि हिजाब वापरत नाही ! – तस्लिमा नसरीन

याविषयी भारतातील हिजाबप्रेमी काही बोलतील का ?

काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण कायदा केला असता, तर मला ४ मुले झाली नसती ! – भाजपचे खासदार रवि किशन

४ मुलांचा विचार केल्यावर वाईट वाटते. हा काँग्रेसचाच दोष आहे. त्यांच्याकडे सरकार होते. त्यांच्याकडे कायदा होता. आम्हाला त्या वेळी भान नव्हते, आम्ही लहान होतो.

आतंकवाद जोपासणार्‍या देशांवर जागतिक दबाव हवा ! – एस्. जयशंकर

आतंकवाद हा कोणत्याही देशाचा हक्क आहे, असे आपण कधीही मानू नये. आतंकवाद संपेपर्यंत आमचा लढा चालूच राहील. आतंकवाद जोपासणार्‍या देशांवर जागतिक दबाव असायला हवा.

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची चौकशी नाहीच !

विलंब झाल्याचे कारण सांगत ही याचिका फेटाळणे योग्य नाही. देहलीतील शीखविरोधी दंगलीची चौकशी नव्याने केली जात आहे. मानवतेच्या विरोधातील गुन्हे आणि नरसंहार यांसारख्या घटनांच्या चौकशीला वेळेची मर्यादा लागू होत नाही – ‘रूट्स इन कश्मीर’

भारतात आगामी काळात येणारी उष्णतेची लाट सहन करण्यापलीकडे असेल !  

जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात भारत आधीपासून उष्णतेचा सामना करत आहे. येणार्‍या उन्हाळ्यापूर्वीच उन्हाळा चालू होणार असून त्याची तीव्रता पूर्वीपेक्षा अधिक असणार आहे’, असा दावा केला आहे. ‘भारत जगातील पहिला देश असेल, ज्यामध्ये उष्णता मनुष्याला सहन करण्याच्या पलीकडे असणार आहे’, असेही यात म्हटले आहे.

तुम्ही देशाला नष्ट कराल !

तुम्ही देशाला नष्ट कराल. जर देशाची सीमा सुरक्षित नसेल, तर देश कसा चालेल ? तुम्हाला वाईट गोष्टींना लगाम घालायला हवा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले.

देहली महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाची सत्ता !

देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २५० जागा असणार्‍या या महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला १३४ जागा मिळाल्या आहेत, तर सत्ताधारी पक्ष भाजपला १०४ जागा मिळाल्याने त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.

आतंकवाद असेपर्यंत पाकशी कोणतीही चर्चा नाही ! – भारताचा पुनरूच्चार !  

आतंकवाद चालू असेपर्यंत पाकिस्तानसमवेत कोणतीही चर्चा होऊ शकत नाहीत, असा पुनरुच्चार भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी केला.