विश्‍व हिंदु परिषद देशात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी चळवळ राबवणार

लव्ह जिहादच्या ४०० प्रकरणांची सूचीही केली प्रसिद्ध !

नवी देहली – विश्‍व हिंदु परिषदेने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्याची घोषणा केली आहे. यासह परिषदेने या संदर्भात केंद्र सरकारने कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. विहिंपने या वेळी देशातील ‘लव्ह जिहाद’च्या ४०० हून प्रकरणांची सूचीही प्रसिद्ध केली आहे.

विहिंपचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी सांगितले की, सामाजिक असंतोष आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्यासाठी लव्ह जिहाद एक मोठे संकट आहे. अवैध धर्मांतर रोखण्यासाठी सशक्त कायद्याची आवश्यकता आहे. या संदर्भात बजरंग दलाकडून १ ते १० डिसेंबरपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ‘शौर्य यात्रा’ काढण्यात येत आहे.विहिंपकडून २१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘धर्म रक्षा अभियान’ राबवण्यात येणार आहे.

——————————————————–