एन्.डी.टी.व्ही.’चे प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांचे प्रवर्तक पदाचे त्यागपत्र

नवी देहली – ‘एन्.डी.टी.व्ही.’ (न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड) या वृत्तवाहिनीचे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक आस्थापन ‘आर्.आर्.पी.आर्. होल्डिंग्ज’च्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचे त्यागपत्र दिले. या आस्थापनाने अदानी समूहाला आस्थापनाच्या मालकीचा काही भाग विकला आहे.

एन्.डी.टी.व्ही.ने शेअर बाजाराकडे सुपुर्द केलेल्या पत्रात ‘आर्.आर्.पी.आर्. होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड’ आस्थापनाच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत सुदिप भट्टाचार्य, संजय पुगालिया आणि सेंथिल सिन्हा चेंगालवरयाना यांची ‘आर्.आर्.पी.आर्.एच्.’च्या संचालकपदी निवड करण्यात आली.