सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास दिला नकार !

ताजमहाल शाहजहान याने बांधल्याची माहिती चुकीची असल्याचे मत

नवी देहली – शाळा, महाविद्यालये आणि विश्‍वविद्यालये यांमध्ये आगरा येथील ताजमहाल शाहजहान याने बांधला, असे शिकवण्यात येते. ही चुकीची माहिती आहे आणि ती काढून टाकण्यात यावी, यासाठी आदेश देण्यात यावा, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. (आता केंद्र सरकारनेच त्या ठिकाणी उत्खनन करून सत्य इतिहास लोकांसमोर आणावा, अशीच हिंदु समाजाची अपेक्षा आहे. असे केल्यास अशा याचिका पुनःपुन्हा प्रविष्ट केल्या जाणार नाहीत ! – संपादक) त्यामुळे याचिकाकर्त्याने त्याची याचिका मागे घेतली आहे.