‘मिसिंग लिंक प्रकल्पा’चा परिणाम !
मुंबई – पुणे-मुंबई रस्ता प्रवासाचे अंतर आता न्यून होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची २५ मिनिटे वाचणार आहेत. जून २०२५ मध्ये चालू होणार्या ‘मिसिंग लिंक प्रकल्पा’मुळे दोन्ही शहरांमधील अंतर न्यून होईल.
१. मुंबई-पुणे शहरांमधील अंतर अल्प करण्यासाठी देशातील सर्वांत मोठा उंच केबल पूल सिद्ध केला जात आहे. दोन डोंगरांच्या मध्ये हा पूल बांधण्यात येईल. तो भूमीपासून १८३ मीटर उंच आहे. त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
२. सध्या खोपोली येथून बाहेर पडणारा रस्ता आणि सिंहगड इंस्टिट्यूट हे अंतर १९ किमी आहे. या पुलामुळे हे अंतर केवळ १३.३ किमी होईल. यामुळे सहा किलोमीटर अंतर दोन्ही शहरांचे कमी होणार आहे.
३. या मार्गात दोन बोगदे आणि दोन केबल पूल असणार आहेत.
४. या पुलाच्या ठिकाणी २५० कि.मी. वेगाने वारे वाहिले, तरी काही परिणाम होणार नाही.