नवी देहली – आतंकवादी संघटनांपैकी एक असलेल्या अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्यावर संताप व्यक्त करत अल् कायदाने हे वक्तव्य केले आहे. अल् कायदाने पाकिस्तानी सैन्याला ‘भ्याड’ म्हटले आहे.
#DNAExclusive: Analysis of #AlQaeda admitting India’s success in #JammuandKashmirhttps://t.co/BuRSEUyi70
— Zee News English (@ZeeNewsEnglish) November 30, 2022
१. अल् कायदाच्या प्रसारित केलेल्या नियतकालिकात भारत सरकारचे काश्मीर धोरण यशस्वी ठरले आहे आणि यासाठी अल् कायदाने पाकिस्तानला दोष दिला आहे. पाक सैन्य काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवण्यास सक्षम नसल्याचे या आतंकवादी संघटनेचे म्हणणे आहे.
२. भारतीय सुरक्षा दल काश्मीरमध्ये सातत्याने आतंकवाद्यांचा खात्मा करत आहेत. या अपयशाला कंटाळून अल कायदाने आता त्याचा राग पाकिस्तानवर काढला आहे.
(सौजन्य : Hindustan Times)
३. अल् कायदाने ‘अन्सार गजावत-उल-हिंद’ ही काश्मीरमधील एकमेव खरी आतंकवादी संघटना असल्याचे म्हटले आहे. काश्मीरमधील सुरक्षा दल अल् कायदा आणि त्याच्याशी संबंधित आतंकवादी संघटन यांचा प्रत्येक डाव हाणून पाडत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराने अनेक पाकिस्तानी आणि विदेशी आतंकवाद्यांना ठार केले आहे.
४. या नियतकालिकात अल् कायदाने मुसलमानांना काश्मीरमध्ये एकत्र येऊन आतंकवाद्यांना पाठिंबा देण्यास सांगितले आहे.