ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसळे याला सरकारने ५ कोटी रुपयांचे पारितोषिक द्यायला हवे !

स्वप्नील याचे वडील सुरेश कुसळे यांची मागणी

स्वप्नील कुसळे

कोल्हापूर – येथील स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ५० मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून भारताची मान उंचावली. खाशाबा जाधव यांच्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या तरुणाने ऑलिंपिकमध्ये पदक मिळवले. राज्य सरकारने स्वप्नील याला १ कोटी रुपयांचे पारितोषिक घोषित केले; पण वडील सुरेश कुसळे यांनी ‘स्वप्नील याला १ कोटी नव्हे, तर ५ कोटी रुपयांचे पारितोषिक सरकारने द्यावे’, अशी मागणी पत्रकारांशी बोलतांना केली.