काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण कायदा केला असता, तर मला ४ मुले झाली नसती ! – भाजपचे खासदार रवि किशन

भाजपचे खासदार आणि अभिनेते रवि किशन

नवी देहली – काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा केला असता, तर मला ४ मुले झाली नसती, असे विधान उत्तरप्रदेशातील गोरखपूरचे भाजपचे खासदार आणि अभिनेते रवि किशन यांनी केले आहे.

रवि किशन पुढे म्हणाले की, ४ मुलांचा विचार केल्यावर वाईट वाटते. हा काँग्रेसचाच दोष आहे. त्यांच्याकडे सरकार होते. त्यांच्याकडे कायदा होता. आम्हाला त्या वेळी भान नव्हते, आम्ही लहान होतो.