मोरोक्कोच्या मुसलमान फुटबॉल खेळाडूची पत्नी बुरखा आणि हिजाब वापरत नाही ! – तस्लिमा नसरीन

नवी देहली – फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेमध्ये आफ्रिका खंडातील मोरोक्को या इस्लामी देशाचा संघ उपांत्य फेरीत पोचला आहे. त्यातील अशरफ हकीमी या खेळाडूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या संघाला पराभूत केल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित स्वतःच्या आईचे चुंबन घेतल्याने वाद झाला आहे. यानंतर हफीमी यांच्याविषयी बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनही ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘हकीमी आणि त्यांची पत्नी हिबा अबूक हे दोघेही मुसलमान आहेत; मात्र हिबा बुरखा किंवा हिजाब घालत नाही.’ यासह नसरीन यांनी हिबा हिची तोकड्या कपड्यांतील छायाचित्रे प्रसारित केली आहेत. हिबा ही स्पेनमधील अभिनेत्री असून तिची आई ट्यूनीशियातील, तर वडील लिबिया देशातील आहेत. ते स्पेनमध्ये रहात आहेत.

संपादकीय भूमिका

याविषयी भारतातील हिजाबप्रेमी काही बोलतील का ?