आतंकवाद जोपासणार्‍या देशांवर जागतिक दबाव हवा ! – एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – आतंकवाद हा कोणत्याही देशाचा हक्क आहे, असे आपण कधीही मानू नये. आतंकवाद संपेपर्यंत आमचा लढा चालूच राहील. आतंकवाद जोपासणार्‍या देशांवर जागतिक दबाव असायला हवा. आतंकवादाला बळी पडलेल्या देशांनी आवाज उठवल्यासच हे शक्य होईल. याविषयी आपण (भारताने) नेतृत्व करायला हवे; कारण जे रक्त वहात आहे, ते आपले आहे’, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस्. जयशंकर यांनी ‘अ‍ॅजेंडा आजतक’ या कार्यक्रमातील मुलाखतीत केले.

भारतीय क्रिकेट संघाने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता. त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेलेला नाही. पुढे पाकिस्तानने ३ एकदिवसीय आणि २ टी-२० क्रिकेट सामन्यांसाठी भारताचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वर्ष २०२२मध्ये झालेल्या टी-२० विश्‍वचषक स्पर्धेतही दोन्ही संघांत सामना झाला. यासह दोन्ही देशांमध्ये वर्ष २०१२-१३ नंतर द्वीपक्षीय बैठक झालेली नाही.