SC On #TirupatiLaddu : सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून नव्‍याने अन्‍वेषण करण्‍यासाठी ५ सदस्‍य समितीची  स्‍थापना करण्‍याचे निर्देश

तिरुपती मंदिराच्‍या प्रसादाच्‍या लाडूमध्‍ये गोमांसाच्‍या चरबीपासून बनवलेले तूप वापरण्‍यात आल्‍याच्‍या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने नव्‍याने अन्‍वेषण करण्‍याचे, तसेच चौकशीसाठी ५ सदस्‍यीय समिती स्‍थापन करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

Air Chief Marshal Attack on India : भारतावर इस्रायलप्रमाणे क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण झाल्‍यास आपण ती सर्व रोखू शकणार नाही !  – एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह

इस्रायलप्रमाणे भारतावर क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण झाले, तर भारत सर्व क्षेपणास्‍त्रे रोखू शकणार नाही; कारण आपले क्षेत्र इस्रायलपेक्षा अधिक आहे, अशी माहिती भारतीय वायूदलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी दिली.

Sadhguru’s Isha Foundation case : ईशा फाऊंडेशनच्‍या आश्रमाची झडती घेण्‍याच्‍या मद्रास उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाला सर्वोच्‍च न्‍यायालयाची स्‍थगिती !

उच्‍च न्‍यायालयाचा आदेश सर्वोच्‍च न्‍यायालय पालटते, यावरून कायद्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात का ? असे प्रश्‍न नागरिकांच्‍या मनात निर्माण होतात !

Delhi Doctor Murder : देहलीत अल्‍पवयीन मुलांकडून डॉक्‍टरची गोळ्‍या झाडून हत्‍या !

अशांना अल्‍पवयीन म्‍हणता येईल का ? अशा मुलांना मोठ्यांना जी शिक्षा सुनावली जाते, तीच शिक्षा सुनावणे आवश्‍यक !

Delhi Police Seize Cocaine : देहलीत २ सहस्र कोटी रुपयांचे ५६० किलो कोकेन जप्‍त

पकडले गेलेले कोकेन इतके आहे, तर देशात न पकडले गेलेले कोकेन किती वितरित झाले असेल, याची कल्‍पना करता येत नाही !

Bulldozer Supreme Court : कुणी आरोपी किंवा दोषी आहे; म्‍हणून त्‍याच्‍या मालमत्तेची तोडफोड होऊ शकत नाही ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून अतिक्रमणाच्‍या विरोधातील बुलडोझर कारवाई ही सर्व नागरिकांसाठी समान असेल, मग ते कोणत्‍याही धर्माचे असो’, असेही निर्देश न्‍यायालयाने दिले.

PM Modi Speaks To Netanyahu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्‍याहू यांच्‍याशी केली चर्चा !

इस्रायलने २८ सप्‍टेंबरला लेबनॉनची राजधानी बेरूतमध्‍ये केलेल्‍या हवाई आक्रमणात लेबनॉनची फुटीरतावादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाला होता. यामुळे एका मोठ्या आतंकवाद्याचा अंत झाल्‍याचे म्‍हटले जाते; परंतु अद्यापही येथे चकमकी चालूच आहेत.

Indian fishermen : शिक्षा संपूनही १३० भारतीय मासेमार पाकिस्तानी कारागृहात खितपत पडून !

यांना सोडवण्यासाठी सरकार काही पावले उचलणार आहे का ?

Delhi Constable Crushed By Car : देहलीमध्ये पोलीस शिपायाला चारचाकीने चिरडले !

नांगलोई परिसरात एका चारचाकी वाहन चालकाने एका पोलीस शिपायाला त्याच्या गाडीखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. हा चालक सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Petition In Delhi High Court : सरकारी कागदपत्रांमध्ये ‘धर्म’ या शब्दाऐवजी ‘पंथ’ किंवा ‘संप्रदाय’ या शब्दांचा वापर करण्यासाठी देहली उच्च न्यायालयात याचिका

उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश