२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील जनगणना पुढे ढकलली

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता एप्रिल मासापासून चालू होणार्‍या वर्ष २०२१ राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन्.पी.आर्.) प्रक्रियेचा पहिला टप्पा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली.

देशामध्ये धान्याचा पुरेसा साठा ! – भारतीय अन्न महामंडळ

देशाला ५-६ कोटी टन धान्याची वार्षिक आवश्यकता असते. एप्रिलच्या शेवटपर्यंत देशभरातील गोदामांमध्ये १० कोटी टन धान्याचा साठा होणार आहे. भारत २०१९-२० मध्ये २९.२ कोटी टन धान्याचे उत्पादन घेणार आहे.

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे संकट असतांनाही तो भारताच्या नौदलाची माहिती काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, हे यातून लक्षात येते !

देहलीतील दंगलीविषयी वक्तव्य करणार्‍या इराणला भारताने फटकारले !

हिंदूंनो, जगातील इस्लामी देश त्यांच्या धर्मियांच्या बाजूने लगेच संघटित होऊन आवाज उठवतात; मात्र हिंदूंच्या बाजूने आवाज उठवणारा जगात एकही देश नाही, हे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र करण्यासाठी कृतीशील व्हा ! भारताने इराणला केवळ फटकारणे पुरेसे नाही, तर त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायला हवे !

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हे आणि राज्ये यांच्या सीमा बंद करा ! – केंद्र सरकारचा आदेश

देशभरात दळणवळण बंदी केल्यामुळे सध्या विविध राज्यांतील परप्रांतीय कामगार स्वतःच्या मूळ गावी परत जात आहेत. अशा स्थलांतरित कामगारांद्वारे कोरोनाचे संभाव्य सामुदायिक संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ………