देहलीमध्ये शिखांच्या धार्मिक संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या शाळेत श्री सरस्वतीदेवीची पूजा केल्याने शिक्षिका निलंबित !

शिखांचा पैसा त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे ! – कमेटीचे माजी अध्यक्ष हरविंदरसिंह सरना

राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’चे नाव आता ‘अमृत उद्यान’ !

राष्ट्रपती भवनाच्या परिसरात बनवलेल्या ‘मुघल गार्डन’चे नाव पालटून आता ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे उद्यान ३१ जानेवारीपासून २६ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येणार आहे.

देशभरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

भारताचा ७४ वा प्रजासत्ताकदिन प्रतिवर्षीप्रमाणे देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे नाव राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर तिन्ही सैन्यदल, अर्धसैनिकदल, पोलीस दल आदींनी संचलन केले. तसेच विविध राज्यांच्या चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले.

‘बीबीसी न्यूज’चा हिंदुद्वेषी माहितीपट दाखवण्यावरून जे.एन्.यू.मध्ये वाद !

माहितीपटावर बंदी असतांना साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न !

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखा !’ चळवळ

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहली, फरिदाबाद आणि मथुरा येथे शहर दंडाधिकारी, जिल्‍हाधिकारी, साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त अशा विविध प्रशासकीय स्‍तरांवर निवेदन देण्‍यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि अनेक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

‘स्पाइसजेट’च्या विमानात हवाई सुंदरीसमवेत गैरवर्तन

गैरवर्तन करणार्‍या व्यक्तीला आणि त्याच्यासमवेत असलेल्या अन्य एका प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले. त्यांना विमातळाच्या सुरक्षा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

भारतीय बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम ‘भरोस’चे परीक्षण

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम (ओ.एस्., भ्रमणभाष प्रणाली) ‘भरोस’चे परीक्षण केले. ही प्रणाली आयआयटी मद्रासने विकसित केली आहे.

चीन सीमेवर भारताकडून केली जाणार १३५ किलोमीटर लांब महामार्गाची निर्मिती !

भारताने चीनला कोणत्याही स्थितीमध्ये प्रत्युत्तर देण्याची सिद्धता म्हणून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चुशूल ते डेमचौक या मार्गावर १३५ किलोमीटर लांब महामार्ग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

(म्हणे) ‘सोमनाथ मंदिर तोडून गझनी याने कोणतीही चूक केली नाही !’ – मौलाना महंमद साजिद रशिदी, ऑल इंडिया इमाम असोसिएशन

हिंदूबहुल भारतात राहून हिंदूंच्या मंदिराविषयी अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस होते, हेच हिंदूंना लज्जास्पद आहे ! पाकमध्येच नव्हे, तर भारतातही अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी कुणी विधान केले, तर काय होते, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे !

भारतीय कुस्तीपटूंचे देहलीतील आंदोलन मागे

भारतीय कुस्तीपटूंचे गेल्या ३ दिवसांपासून चालू असलेले जंतरमंतरवरील आंदोलन २० जानेवारीच्या मध्यरात्री मागे घेण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी ही घोषणा केली.