राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’चे नाव आता ‘अमृत उद्यान’ !

केंद्रातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

नवी देहली – येथील राष्ट्रपती भवनाच्या परिसरात बनवलेल्या ‘मुघल गार्डन’चे नाव पालटून आता ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे उद्यान ३१ जानेवारीपासून २६ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येणार आहे. या उद्यानांतील विविध फुलांचे सौंदर्य पहाण्यासाठी प्रतिवर्षी देश आणि विदेश येथून लोक येत असतात. १५ एकर परिसरात पसरलेल्या या उद्यानाची निर्मिती ब्रिटीश काळात झाली होती.

अमृत उद्यानामध्ये १३८ प्रकारचे गुलाब, १० सहस्रांपेक्षा अधिक ट्यूलिप आणि अन्य विविध ७० फुलांची झाडे आहेत. हे उद्यान देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्वसामान्यांसाठी उघडले होते. तेव्हापासून प्रतिवर्षी वसंत ऋतूमध्ये जनतेसाठी उघडले जाते.

संपादकीय भूमिका

मोगलांची कोणतीही ओळख या देशात शिल्लक ठेवू नये, असेच हिंदूंना वाटते !