श्री कालीमातेला सिगरेट ओढतांना दाखवणार्‍या चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या अटकेला स्थगिती !

श्री कालीमातेचे आक्षेपार्ह चित्र प्रसारित करणार्‍या चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. लीना यांनी त्यांच्या माहितीपटामध्ये श्री कालीमातेला हातात समलैंगिकतावाल्यांचा झेंडा घेऊन सिगरेट ओढतांना दाखवले होते.

देहलीतील ब्रह्मपुरी येथे हिंदू घरे विकून करत आहेत स्‍थलांतर

अशी स्‍थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्‍तानात ? देशाच्‍या राजधानीत हिंदूंची अशी स्‍थिती असेल, तर अन्‍यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !

देहलीतील भिंतीवर लिहिण्यात आली ‘खलिस्तान झिंदाबाद’ची घोषणा !

देशद्रोही खलिस्तानी चळवळ देशात पुन्हा वळवळू लागली आहे. तिला आताच ठेचण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा मागील चुकीप्रमाणे आता चूक केली, तर पुन्हा एकदा मोठी हानी होऊ शकेल !

देहलीपासून मुंबईपर्यंत समन्‍वय असलेली व्‍यवस्‍था आणा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शहरांच्‍या विकासासाठी सामर्थ्‍य आणि इच्‍छाशक्‍ती यांची कोणतीही न्‍यूनता केंद्रशासनामध्‍ये नाही; परंतु मुंबईसारख्‍या शहरामध्‍ये महानगरपालिकेसारख्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था विकासासाठी सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विकास गतीने होऊ शकत नाही.

आम्‍हाला पाकशी सामान्‍य शेजार्‍यासारखे संबंध हवे आहेत; मात्र आतंकवाद नको ! – भारत

पाकिस्‍तान आणि आतंकवाद या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू असल्‍याने ते एकमेकांपासून कधीही वेगळे होऊ शकत नाहीत, हे गेल्‍या ७५ वर्षांत संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्‍यामुळे भारताने पाकशी चांगले संबंध ठेवण्‍यासाठी नव्‍हे, तर त्‍याला मूळासह नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजे !

जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ करणार नाही !  

झारखंड येथील सम्मेद शिखरजी हे जैन तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रच राहील, त्याचे पर्यटनस्थळात रूपांतर केले जाणार नाही, असा निर्णय केंद्रशासन आणि झारखंड शासन यांनी घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बालसिंह लालपुरा यांनी दिली.

कायदेशीर वाद सोडवण्यासाठी ऑनलाईन स्रोतांपासून सावध रहावे !  – सर्वोच्च न्यायालय

जगभरातील ज्ञान विनामूल्य उपलब्ध करून देणार्‍या ऑनलाईन स्रोतांची उपयुक्तता मान्य आहे; मात्र कायदेशीर वाद सोडवण्यासाठी अशा स्रोतांचा वापर करण्यापासून सावध रहावे, असे स्पष्ट प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यावरील सुनावणीच्या वेळी केले.

महंमद शरीफ याने देहलीतील ‘द लीला’ हॉटेलला २३ लाख रुपयांना ठकवले !

एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !

त्रिपुरात १६ फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँड येथे २७ फेब्रुवारीला मतदान !

केंद्रीय निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे दिनांक घोषित केले. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँड या राज्यांमध्ये २७ फेब्रुवारी या दिवशी मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल २ मार्च या दिवशी घोषित होतील.