‘इकॉनॉमिक्स टाइम्स’कडून शिवलिंगाचा अवमान करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध

नवी देहली – ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’च्या २२ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या अंकात ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगावरून त्याचा अवमान करणारे एक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

यात मुंबईतील ‘भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर’च्या घुमटाकार भागाला ‘शिवलिंग’ म्हणून संबोधत त्यावर शीर्षक म्हणून ‘बाँब भोलेनाथ’ असे लिहिले आहे.

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक) 

संपादकीय भूमिका

भारतात देवतांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा नसल्याने सातत्याने हिंदूंच्या देवतांचा असा अवमान केला जातो आणि कुणालाही शिक्षा होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !