जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते !

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचे ट्वीट !

(डावीकडे) अधीर रंजन चौधरी

नवी देहली – काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी २१ मे या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली. या ट्वीटमध्ये त्यांनी राजीव गांधी यांचे ‘जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते’, असे वाक्य लिहिले. नंतर त्यांनी हे ट्वीट हटवले. ट्वीट हटवतांना चौधरी यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले, ‘माझ्या ट्विटर खात्यावरून करण्यात आलेल्या ट्वीटमधील विचार माझे नाहीत.’ तसेच चौधरी यांच्या ट्वीटवरून त्यांच्यावर टीका होऊ लागल्यावर चौधरी म्हणाले की, मला अपकीर्त करण्याचे अभियान राबवले जात आहे. माझे खाते हॅक करण्यात आले होते, असा दावा केला.