निधन वार्ता

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या श्रीमती श्रुती भट यांच्या मातोश्री श्रीमती निर्मलाबाई डोरले (वय ९१ वर्षे) यांचे २१ मे या दिवशी मोताळा (जिल्हा बुलढाणा) येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

मुंबईचे माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे निधन

अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही शिवसैनिक उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्‍वर यांची प्रकृती ठीक नव्हती. ते मूळचे सिंधुदुर्ग येथील होते.

रत्नागिरीला येत असतांना दहिसरचे मनसे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू

मनसेचे राज ठाकरे यांची ६ मे या दिवशी रत्नागिरीला होत असणार्‍या सभेसाठी मुंबईहून येत असतांना दहिसर येथील मनसेचे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

निधन वार्ता

दहिसर (मुंबई) – येथील साधक सुधाकर नाईक-साटम (वय ९० वर्षे) यांचे ५ मे या दिवशी दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार नाईक-साटम परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.

सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या जहाजावरील साडेतीन सहस्र शेळ्या-मेढ्यांपैकी ३०० शेळ्यांचा मृत्यू

बहुतांशी शेळ्या-मेंढ्यांची उपासमार झाली होती. त्यात समुद्रातील प्रवासामुळे अनेक  शेळ्या अशक्त बनल्या होत्या. जहाजाची क्षमता ८०० ते १ सहस्र मेंढ्यांची असतांना साडेतीन हजार शेळया-मेंढ्यांची वाहतूक करण्यात आली होती.

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन !

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे २ मे या दिवशी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

जागतिक व्यासपिठावर भारताची बाजू समर्थपणे मांडणारे प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक तारेक फतेह यांचे निधन

अनेक वर्षांपासून ते कॅनडातील प्रसिद्ध दैनिक ‘टोरंटो सन’मध्ये स्तंभकार म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी भारतीय वृत्तवाहिनी ‘झी न्यूज’वरील ‘फतेह का फतवा’ हा त्यांचा कार्यक्रम पुष्कळ लोकप्रिय झाला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

जिहादी आतंकवाद्यांचे मूळ म्हणजे पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !

हुतात्मा अजय ढगळे यांच्यावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार

सुभेदार अजय ढगळे हे देशसेवेत होते. २७ मार्च या दिवशी भारत-चीन सीमेवर तवांग परिसरात रस्त्याच्या कामाच्या ‘रेकी’साठी ढगळे गेले असतांना तेथे झालेल्या भूस्खलनात ते हुतात्मा झाले.